लघुसिंचन विभाग

लघुपाटबंधारे विभाग

विभाग प्रमुखाचे नाव श्री. बंडू विठ्ठल सयाम
पदनाम जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा)
दुरध्वनी क्रमांक 07132-297473
ई-मेल eemizpgadchiroli@gmail.com
कक्ष प्रमुखाचे नाव श्री. राजेश्वर चंद्रभानजी गजभे
पदनाम प्र.सहाय्यक जिल्हा जलसंधारण अधिकारी (ल.पा)
दुरध्वनी क्रमांक 07132-297473
ई-मेल eemizpgadchiroli@gmail.com
* महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचे शासन निर्णय क्र.आस्थाप:2016/प्र.क्र.88 (भाग -9/जल-2,दि 31 मे 2017 अन्वये मृद व जलसंधारण विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच शासन निर्णय मृद व जलसंधारण मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र.आस्थापना -2022 /प्र.क्र.58/जल15 दि.5/12/2022 अन्वये जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद यंत्रणेकडील गट क व गट–ड पदाचे नियुक्ती व शिस्तभंगविषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे आहेत .मात्र जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद यांचे गट –क व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते आयुक्त कार्यालया मार्फत वितरीत करण्यात येतात . * लघु सिंचाई विभाग हा जिल्हा परिषद गडचिरोली येथील महत्वपुर्ण विभाग असुन त्याअंतर्गत गडचिरोली ,वडसा ,कुरखेडा ,चामोर्शी ,अहेरी या 5 उपविभागाचा समावेश आहे .लघुसिंचाई विभागामध्ये तांत्रीक ,लेखा तसेच आस्थापनाविषयक कामे होतात. उपविभागाअंतर्गत ग्रामिण भागात प्रामुख्याने बंधारे ,तलाव ,सिंचन विहिरी इत्यादी योजना निहाय कामे करण्याकरीता जिल्हा नियोजन समिती मार्फत तसेच राज्य सरकार मार्फत अनुदान प्राप्त होत असते. * लघुपाटबंधारे विभाग जिल्हा परिषद गडचिरोली मार्फत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना 2702-6828 च्या निधी मधून साठवण बंधारे/को.प.बंधारे दुरुस्ती/बांधकाम,लघुपाटबंधारे तलावाची दुरुस्तीची कामे , आदिवासी उपाययोजने च्या निधी मधून, को.प. बंधारे , साठवण बंधारे बांधकाम व दुरुस्तीची कामे (आदिवासी क्षेत्रबाहय उपाययोजना 2225-E338 जिल्हा निधी -2702 मधून आवश्यक दुरुस्तीची कामे,जलयुक्त शिवार अभियान मधून बंधारे व मा.मा.तलावाची कामे,मा.मा.तलाव पुनर्जिवन व बळकटीकरण अभियान मधून तलावाची दुरुस्तीची कामे,13000 सिंचन विहिर कार्यक्रम मधून सिंचन विहीरीचे बांधकाम, जलशक्ति अभियान अंतर्गत (CATCH THE RAIN) ची कामे, इत्यादी योजना राबविण्यात येतात . * महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम-1961 नुसार जि.प.गडचिरोली अंतर्गत लघुपाटबंधारे जिल्हा परिषद विभागातील वर्ग-3 व वर्ग-4 मधील खालील कामे हाताळण्यात येतात. 1.स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या संवर्गातून जलसंधारण अधिकारी म्हणून पदोन्नती देणे. 2.जिल्हा परिषद अंतर्गत घेण्यात येणा-या ल.पा.योजनांच्या बांधकाम व दुरुस्ती समितीच्या सभेचे आयोजन करणे व नियंत्रण ठेवणे. 3.जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा परिषद लघुपाटबंधारे उपविभागाचे कामावर नियंत्रण ठेवणे.
लघुपाटबंधारे विभाग ,जिल्हा परिषद, मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची गावपातळीवर प्रचार व प्रसिध्दी करुन लोकाचे राहणीमान उंचावण्याकरीता व त्यांना दळणवळणाची सोय उपलब्ध करून देण्याचे संबंधाने कामे करणे.
1.कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या विविध विकासाच्या कामाचा आढावा घेणे व जेथे कामाची प्रगती समाधानकारक नाही किंवा प्रत्यक्ष जागेवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्यास त्याचे निराकरण करणे व कामाची तपासणी करणे. 2.अधिनस्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी नेमून दिलेली कामे व कर्तव्य समाधानकारक पार पाडतात किंवा नाही याची तपासणी करणे. 3. क्षेत्रीय कार्यालयात बांधकाम व दुरुस्ती विषयक बाबी शासनाने नेमून दिलेल्या नियमानुसार होतात किंवा नाही याची पाहणी करणे व मार्गदर्शन करणे. जिल्हा परिषदेमार्फत शासकीय योजनेचा प्रसार स्थानिक लोकांशी संपर्क साधून करणे स्थानिक लोक व लोकप्रतिनिधी यांचा विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी सहयोग मिळविणे. 4.वरील उद्देश साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी शासनाने ठरवुन दिलेल्या प्रशासकीय सेट अप प्रमाणात दौरे व रात्रीचे मुक्काम विहित केलेले आहेत.
राज्य सरकार :- जलयुक्त शिवार अभियान, मा.मा. तलाव पुनर्जिवन वबळकटीकरण अभियान, 13000 धडक सिंचन विहीर कार्यक्रम योजने अंतर्गत विकास कामाची अंमलबजावणी करण्यात येते. केंद्र सरकार :- जलशक्ती अभियान (कॅच द रेन), अमृत सरोवर इत्यादी योजनेअंतर्गत विकास कामाची अमंलबजावणी करण्यात येते. संयुक्त उपक्रम केंद्र आणि राज्य :- जलशक्ती अभियान (कॅच द रेन), अमृत सरोवर इत्यादी योजनेअंतर्गत विकास कामाची अंमलबजावणी करण्यात येते.
धोरणे आणि मार्गदर्शक तत्वे :- लघुपाटबंधारे विभाग, जि.प. गडचिरोली मार्फत जिल्हा वार्षिक योजना 2702-6828 को.प. बंधारे बांधकाम व दुरुस्ती (गैरआदिवासी), टी.एस.पी.को.प.बंधारे/साठवण बंधारे बांधकाम व दुरुस्ती (आदिवासी क्षेत्रबाह्य उपाययोजना 2225 E338T), जिल्हा निधी,13 वने मध्ये मा.मा.तलाव दुरुस्ती,जलयुक्त शिवार अभियान, मा.मा.तलाव पुनर्जिवन व बळकटीकरण अभियान, 13000 धडक सिंचन विहीर कार्यक्रम, जलशक्ती अभियान (कॅच द रेन) इ. योजना राबविण्या संदर्भात जि.प. वेबसाईटवर ऑनलाईन प्रकाशीत करण्यात येते.
वेतन व भत्ते याव्यतिरीक्त उर्वरीत हस्तांतरण योजना व अधिग्रहीत योजना कामे या संदर्भात जिल्हा परिषदांना उपलब्ध करुन दिलेल्या अंदाजपत्रकीय तरतुदी यांचे रीतसर नियोजन करुन या नियमाप्रमाणेच खर्च करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदांची आहे. व याकरीता महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 व महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती लेखा संहिता नियम 1968 शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय व मार्गदर्शक सुचना यास अनुसरुन योजना राबविण्याची कार्यवाही करण्यात येते.
प्रथम अपीलीय अधिकारी - जिल्हा जलसंधारण अधिकारी – श्री बि.व्हि.सयाम (9623403007) जन माहिती अधिकारी – कनिष्ठ प्रशासन अधिकारी - कु.एस.पी.दहीकर (9420845292) सहाय्यक जन माहिती अधिकारी - वरिष्ठ सहाय्यक- श्री.पी.जे.पिजंरकर (8830804014)
error: Content is protected !!