बांधकाम विभाग
|
बांधकाम विभाग हा जिल्हा परिषद, गडचिरोली चा महत्वाचा विभाग आहे जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत दळवळणाच्या सोईसुविधा पोहचविण्याकरीता ग्रामिण मार्ग व इतर जिल्हा मार्गावर विविध योजनांमार्फत कामे मंजुर कामांची अंदाजपत्रके तयार करून पुर्ण केली जातात. आरोग्य संस्थांमार्फत मंजुर केलेली प्रा.आ.केंद्र, प्रा.आ.उपकेंद्र व प्रा.आ.पथकांचे दुरूस्तीची तसेच बांधकामाची कामे बांधकाम विभागामार्फत केली जाताता. ग्रामिण भागांमध्ये सभागृह, रस्ते, नाली बांधकामे या विभागामार्फत केली जातात.
जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग १ अधिकारी असतो. कार्यकारी अभियंता (बांधकाम) हे त्यांचे पद आहे. हेच अधिकारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सचिव आहेत. यासोबत एक वर्ग १ अधिकारी राहतो. पंचायत समिती स्तरावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे हा वर्ग १ अधिकारी असतो. या विभागामार्फत जिल्हा परिषदेचे बांधकामाचे अंदाजपत्रक तयार करणे, कामांवर पाहणी करणे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग १ अधिकारी असतो. त्यांचे पद कार्यकारी अभियंता (बांधकाम) आहे. हेच अधिकारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सचिव आहेत. याशिवाय, पंचायत समिती स्तरावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन वर्ग १ अधिकारी जिल्ह्यातील २ उपविभागांमध्ये उपविभागीय अभियंता म्हणून वर्ग-1 चे उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतात.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात मूलभूत सुविधांमध्ये इमारती, रस्ते यांचा समावेश होतो. ग्रामीण भागातील प्रत्येक गाव रस्त्याने जोडले गेले पाहिजे. त्यासाठी या विभागातील यंत्रणा कडक आहे. चालू वर्षातील नियमित कामे वेळेत पूर्ण करून पुढील वर्षाचे नियोजन करणे आणि आवश्यक निधी, VR, ODR, आणि MDR इत्यादी रस्त्यांच्या देखभालीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे. याशिवाय केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रस्तेबांधणी झाली आहे.
अ.क्र. | पदाचे नाव | मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
---|---|---|---|---|
1 | कार्यकारी अभियंता (बांधकाम) | 1 | 1 | 0 |
2 | उपकार्यकारी अभियंता (बांधकाम) | 1 | 1 | 0 |
3 | उपविभागीय अधिकारी | 08 | 04 | 04 |
3 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 66 | 63 | 03 |
4 | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक | 65 | 61 | 04 |
6 | कनिष्ठ प्रशासन अधिकारी | 1 | 0 | 1 |
7 | वरिष्ठ सहाय्यक (लि.व.) | 09 | 06 | 03 |
7 | वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | 02 | 02 | 00 |
8 | कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | 01 | 01 | 00 |
9 | कनिष्ठ सहाय्यक (लि.व.) | 09 | 08 | 01 |
10 | विस्तार अधिकारी (सांखिकी) | 01 | 01 | 00 |
11 | वरिष्ठ सहाय्यक (भांडारपाल) | 01 | 00 | 01 |
12 | कनिष्ठ सहाय्यक (भाडारपाल) | 01 | 00 | 01 |
13 | परिचर | 08 | 07 | 01 |
जिल्हा परिषदेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व जन कल्याणकारी बांधकामाची कामे विविध योजनामार्फत सुरळीत व जलदगतीने कामे पार पाडणे.
सेवा :-
विशेष केंद्रीय सहाय्य योजना (केंद्र सरकार योजना, भारत सरकार)
2. 3054-2422 (राज्यस्तरीय योजना)
3. 3054-2419 (राज्यस्तरीय योजना)
4. 2515-1238 (राज्यस्तरीय योजना)
5. जिल्हा वार्षिक योजना
6. जिल्हा वार्षिक आदिवासी उपाययोजना
7. स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार / खासदार निधी.
8. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रम.
9. जिल्हा खनिज विकास कार्यक्रम
10. 13 वने.
राज्य सरकार :-
3054-2422 (राज्यस्तरीय योजना)
3054-2419 (राज्यस्तरीय योजना)
2515-1238 (राज्यस्तरीय योजना)
केंद्र सरकार
विशेष केंद्रीय सहाय्य योजना