पशुसंवर्धन विभाग
|
महाराष्र्ट जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार जि.प. गडचिरोली अंतर्गत पशुसंवर्धन विभागातील वर्ग 3 व वर्ग 4 मधील खालील कर्मचा-या कडुन कामे हाताळण्यात येतात.
1. पशुधन पर्यवेक्षक या संवर्गातुन सहाययक पशुधन विकास अधिकारी या पदावर पदौन्नती देण्यात येते.
2. जिल्हा परिषदे अंतर्गत घेण्यात येणा-या पशुसंवर्धन समितीच्या सभेचे आयोजन करणे व नियंत्रण ठेवणे.
3. जिल्हा परिषदे अंर्तगत येणारे प.सं. स्तरावरिल पशुसंवर्धन विभागाचे कामावर नियंत्रण ठेवणे.
दि. 26 आगष्ट 1982 रोजी चंद्रपुर जिल्हयाचे विभाजनाने गडचिरोली जिल्हयाची निर्मीती झाली. जिल्हयात पशुसंवर्धनाचे कार्याकरीता राज्यस्तरीय व स्थानिक स्तरीय खालील प्रमाणे पशुवैद्यकिय संस्था कार्यरत आहेत.
राज्यस्तर
1. जिल्हा पशुवैद्यकिय सर्वचिकित्सालय गडचिरोली.
2. जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र गडचिरोली.
3. बदक पैदास प्रक्षेत्र वडसा.
4. तालपसचि-5
5. तपासणी नाका.
स्थानिक स्तर
1. पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी 1 चे 92
2. पशुवैद्यकिय दवाखाने श्रेणी 2 चे 39
3. फिरते पशुचिकित्सालय 07
पशुसंवर्धन विभाग जि.प. गडचिरोली मार्फत एकात्मीक कुक्कुट विकास कार्यक्रम अंतर्गत एक दिवसिय सुधारित कुक्कुट पक्ष्यांच्या पिल्लाचे गट वाटप करणे. वि.घ.यो. अंर्तगत अनुसुचित जाती/ नवबौध्द लाभार्थ्याना 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप योजना, 75 टक्के अनुदानावर शेळी गट वाटप योजना
(10 शेळी + 1 बोकड) ,अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे वाटप ,आदीवासी क्षेत्राबाहेरिल उपयोजना अंर्तगत 50 टक्के व 100टक्के अनुदानावर , वैरण विकास कार्यक्रम अंर्तगत शेतक-यांच्या शेतावर वैरण उत्पादनासाठी प्रोत्साहन पर वैरण बियाणे वाटप, शेळी प्रजनन साठी उत्तम प्रतीचा बोकड वाटप करणे योजना इ. योजना राबविण्यात येतात.
पशुपालनाला चालना व अत्याधुनीक सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता कार्यमोहीमा,पशुप्रर्दशनी,कार्यशिबिरे,पशुसंवर्धन विषयक कायद्याची अमलबजावणी इ. कामे.
पशुसंवर्धन विभागा मार्फत राबविण्यात येणा-या योजनाची गाव पातळीवर प्रचार व प्रसिध्दी करुन लोकांचे आर्थिक विकास करण्यास्तव पशुसंवर्धन विभागा मार्फत योजना राबविली जाते.
कार्य व उदिष्टे
1. पशुवैद्यकिय उपचार
2. कृत्रिम रेतन
3. गावठी वळुचे खच्चीकरण
4.साथीच्या रोगाचा प्रसार होउ नये म्हणुन
रोगप्रतिबंधात्मक लसीकरण
5.पशुपालकांना प्रशिक्षण- कुक्कुड,शेळीपालन,
दुग्ध व्यवसाय
6.विविध योजना अंर्तगत एक दिवसीय कुक्कुड पिल्लांचे
वाटप,तलंग गट वाटप,शेळीगट वाटप,दुधाळ जनावरे
वाटप,वैरण बियाणे बाटप.
1.पशुसंवर्धन विभागा मार्फत राबविण्यात येणा-या योजनाची गाव पातळीवर प्रचार व प्रसिध्दी करुन लोकांचे आर्थिक विकास करण्यास्तव पशुसंवर्धन विभागा मार्फत योजना राबविली जाते
2.अधिनस्त क्षेत्रिय अधिकारी व कर्मचारी नेमुन दिलेली कामे व कर्तव्य समाधान कारक पार पाडतात किंवा नाही याची तपासणी करणे.
3.क्षेत्रिय कार्यालयात पशुसंवर्धन विषयक बाबी शासनाने नेमुन दिलेल्या नियमानुसार होतात किंवा नाही याची पाहणी करणे. जिल्हा परिषदे मार्फत शासकिय योजनांचा प्रसार स्थानिक लोकांशी संर्पक साधुन करणे स्थानिकलोक ,लोकप्रतिनिधी यांचा विविध विकासाच्या योजना कार्यान्वीत करण्यासाठी सहयोग मिळविणे.
4.वरिल उददेश साध्य करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचा-यांसाठी शासनाने ठरवुन दिलेल्या प्रमाणात दौरे व रात्रीचे मुक्काम विहीत केलेले आहेत.
नागरिकाची सनद प्रसिध्द करण्यात आली असुन कार्यालयाचे दर्शनी भागात लावण्यात आली आहे.
राज्य सरकार :- दुधाळ जनावरे वाटप, गाई आणि मशी चे गट वाटप,कुकुट पालन अंतर्गत पक्षी पिल्ले वाटप, तलंग गट वाटप.
केंद्र सरकार :- पशुखाद्य व बियाणे वाटप
मासिके/वृत्तपत्रे :- पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची दैनिक वृत्तपत्रातुन प्रसिध्दी करण्यात येते.
प्रथम अपिलीय अधिकारी— डॉ.अजय तुकाराम ठवरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी. Mob नो. ८२७५१८८१८९
जनमाहीती अधिकारी – पी.एस.सीडाम, सहाययक प्रशासन अधिकारी, Mob नो. ९४२१८५७११२
सहाय्यक जन माहीती अधिकारी- एस. बी.आष्टीकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, Mob नो. ९४२२९१२८५९