आरोग्य विभाग
|
आरोग्य विभाग, जि.प. गडचिरोली अंतर्गत एकुण 52 प्राथमिक आरोग्य केंद्र, 376 उपकेंद्र, 7 आयुर्वेदीक दवाखाने, 12 तालुका आरोग्य अधि. कार्यालये कार्यरत असून त्यामार्फत ॲनिमिया मुक्त भारत, आशा स्वयंसेविका योजना, आयुष, कुटूंब कल्याण कार्यक्रम,आरोग्य वर्धीनी केंद्र, एकात्मीक रोग सर्वेक्षण कार्यक्रम, रुग्ण वाहीका टोल फ्री क्र. 102 सेवा, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, पायाभुत सुविधा विकास कक्ष, मानव विकास कार्यक्रम, प्रधानमंत्री मात्रु वंदना योजना, राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, सार्वजनिक आरोग्य सुविधासाठी राष्ट्रीय गुणवत्ता फ्रेमवर्क, राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशन, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम, क्षयरोग संसर्ग आणि प्रदर्शनाचा स्त्रोत, इत्यादी कार्यक्रम राबविले जाते.
सर्व समावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे.
1. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र याव्दारे सुरु असलेल्या ग्रामीण भागतील आरोग्य सेवेचा नियमितपणे आढावा घेउन प्राप्त उध्दीष्टांची 100 टक्के लक्षपूर्ती करण्यासंबधाने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही करण्यात येते.
2. ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होणा-या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे.
3. समाजातील सिकलसेल वाहक रुगण व्यक्ती शोधुन काढणे व त्यांनी आप-आपसात विवाह टाळावा यासाठी समुपदेश करणे.
4. क्षयरोगाचा संसर्ग वाढु नये यादृष्टीने क्षयरोगग्रस्त रुग्ण शोधून त्यांना मोफत उपचार सुविधा पुरविणे.
5. ग्रामीण भागातील आरोग्य मान उंचावण्याच्या दृष्टीने इतर आवश्यक उपाययोजना करणे.
संलग्न कार्यालये :- मा.आयुक्त,आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,रा.आ.अ मुंबई
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई
मा.संचालक,आरोग्य सेवा मुंबई
मा.संचालक,आरोग्य सेवा पुणे
मा.आरोग्य उपसंचालक,आरोग्य सेवा नागपुर विभाग,नागपुर.
संचालनालय/ आयुक्तालय :- मा.आयुक्त,आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,रा.आ.अ मुंबई
राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई
मा.संचालक,आरोग्य सेवा मुंबई
मा.संचालक,आरोग्य सेवा पुणे
मा.आरोग्य उपसंचालक,आरोग्य सेवा नागपुर विभाग,नागपुर.
मंडळे/उपक्रम :- मा.आरोग्य उपसंचालक,आरोग्य सेवा नागपुर विभाग,नागपुर.
सेवा:- जननी सुरक्षा योजना -JSY
धोरण- राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील दारीद्रय रेषेखालील व अनु.जाती व जमातीच्या महिलांचे आरोग्य संस्थामध्ये होणाऱ्या प्रसुतीचे प्रमाण वाढविणे व माता मृत्यु व अर्भक मृत्युचे प्रमाण कमी करणे.
मार्गदर्शक तत्वे - ग्रामीण व शहरी भागातील सदर गर्भवती महिला अनु.जाती, अनु.जमाती ची असावी. इतर प्रवर्गातील गर्भवती महिला ही दारीद्रय रेषेखालील असावी. सदर लाभार्थी महिलांच्या वयाची अट शिथील करण्यात आली. सदर योजनेचा लाभ देतांना अपत्याची अट शिथील करण्यात आलेली आहे. ( शासकीय आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती केल्यास ७०० रुपये, शहरी भागात प्रसूती केल्यास ६०० रुपये, घरी प्रसूती केल्यास ५०० रुपये, सिजर L.S.C.S. प्रसूती केल्यास १५०० रुपये मातांना दिले जातात.)
प्रधानमंत्री मात्रु वंदना योजना –PMMVY
धोरण - प्रसुतीनंतर बाळाचा व आईचा सकस व पोष्टीक आहार नियमित सुरु राहावा व बाळ कुपोषीत होउ नये म्हणून आहाराकरिता आर्थीक मदत देण्याकरिता तसेच माता मृत्यू व अर्भक मृत्यू कमी करण्याच्या यादृष्टीने सदर योजना राबविण्यात येते. या योजन अंतर्गत मिळणारा लाभ पहिल्या जिवीत अपत्याकरिता पात्र लाभार्थी महिलेस रु. 5000/- व दुसऱ्या प्रसूती मध्ये स्त्री (मुलगी ) जिवीत अपत्याकरिता पात्र लाभार्थी महिलेस रु. 6000/- एवढी रक्कम आधार संलग्न बँक अथवा पोस्ट ऑफीस मधील खात्यात डीबीटी व्दारे तीन टप्प्यात जमा केली जाते.
मार्गदर्शक तत्वे - ज्या महिलांचे निव्वळ कौटूंबीक उत्पन्न प्रतिवर्ष रु. 8 लाखापेक्षा कमी आहे, ज्या महिला अनु.जाती/जमाती प्रवर्गाच्या आहेत, ज्या महिला अंशता (40 टक्के) किंवा पुर्ण अपंग आहेत, ज्या महिला बीपील सिधापत्रिका धारक आहेत, ज्या महिलांकडे ई-श्रम कार्ड धारक आहेत, ज्या महिलांकडे मनरेगा जॉबकार्ड घेतलेल्या आहेत, ज्या महिला गर्भवती व स्तनपान करणा-या आंगणवाडी सेविका/ आंगणवाडी मदतनीस/ आशा कार्यकर्ती आहेत, ज्या महिला किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकरी आहेत अशा महिलांकरिता सदर योजना राबविण्यात येते.
मानव विकास कार्यक्रम –
धोरण - मानव विकास कार्यक्रम अंतर्गत तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरोदर माता / स्तनदा माता, 0 ते 6 वयोगटातील बालकांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करणे तसेच गरोदर माता / स्तनदा माता यांना बुडीत मजुरी देण्यात येते. गरोदरपणाचे व प्रसुतीच्या काळात मातांना पुरेश विश्रांती घेता यावी जेणेकरुन माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे या धोरणाअंतर्गत् सदर योजना राबविण्यात येते.
मार्गदर्शक तत्वे - या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात जाणे आवश्यक आहे, या योजनेचा लाभ अनु.जाती/ जमाती व दारीद्रय रेषेखालील गरोदर/ प्रसुत मातांनाच देण्यात येते, योजनेचे अनुदाना प्रा.आ.केंद्राचे वैद्यकिय अधिकारी किंवा आरोग्य सेविका यांचे मार्फत दिल्या जाते, महिलेच्या 7 ते 9 महिण्याच्या गरोदरपणाच्या काळात 2000/- रुपये व प्रसुतीनंतर 2000/- रु. या प्रमाणे एकुण 4000/- रु. बुडीत मजुरीपोटी दिल्या जाते.
नवसंजीवनी योजना –NAVSANJIVANI SCHEME
माता मृत्यु, अर्भक मृत्यु व बालमृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आदिवासी भागात नवसंजीवनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातुन महिलांसाठी सोयी सुविधा देण्यात येत आहे. शासनाने आदिवासी उपयोजना अंतर्गत कार्यन्वित असलेल्या विविध योजनांच्या अमलबजावणीमध्ये एकसुत्रता व प्रभावीपण आण्ण्याचे दुश्टीने सर्व घटक कार्यक्रमांना एकत्र करुन नवसंजीवनी योजना शासन निर्णय दि. 25 जुन 1995 अन्वये सुरु केलेली आहे.
आदिवासी प्रवण कार्यक्षेत्रातील जनतेच्या आरोग्यात सुधारणा करणे, त्यांना आरोग्य विषयक सुविधा पुरवणे, आदिवासींना पिण्याचे शुध्द व पुरेसे पाणी उपलब्ध करुन देणे, अन्यधान्य पुरवठा सुनिश्चित करुन आहार देणे, बालकांवर योग्य व वेळीच उपचार करुन त्यांच्या प्रकृतीत सुधारणा घडवून आणणे या सर्व उपाययोजनांद्वारे आदिवासीचे क्रियाशील आयुष्य वाढविणे हा नवसंजीवनी योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
नवसंजीवनी योजनेची विशेष वैशिष्ट्ये
मातृत्व अनुदान योजना-
गरोदर मातांची नियमित आरोग्य तपासणी व्हावी व त्यांना सुयोग्य आहार वेळेत उपलब्ध व्हावा तसेच त्यांना गरोदरपणात व नंतर विश्रांती मिळावी त्या दृष्टीने शासनाने मातृत्व अनुदान योजना राबविण्यात येते. या योजनेमध्ये मातेला आरोग्य संस्थेत प्रसुती पश्चात रुपये ४००/- रोखीने व गरोदर काळात रुपये ४००/- ची औषधे याप्रमाणे प्रत्येक लाभार्थीला एकूण रुपये ८००/- चा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ ३ जिवंत अपत्ये (२ जिवंत अपत्ये व सध्या गरोदर) असणा-या आदिवासी महिलांना दिला जातो
मानसेवी डॉक्टर योजना-
दुर्गम भागात राहणा-या आदिवासी जनतेला विशेष करुन माता व बालकांना औषधोपचार वेळीच व नजिकच उपलब्ध व्हावेत त्या दृष्टीने गडचिरोली जिल्हयात एकूण 54 मानसेवी वैद्यकीय अधिकारी मंजुर असुन 47 (सध्या कार्यरत) नियुक्त करून योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
सदर भरारी पथकातील वैदयकीय अधिकारी यांना शासकीय अनुदानातून रुपये 22000/- प्रतिमाह व रुपये २०००/- प्रति महिना प्रति पथक औषधाकरिता अनुदान मंजूर करण्यात येते. आर.सी.एच.पी.आय.पी. (एन.आर.एच.एम.) मधुन रुपये 18000/- अतिरिक्त मानधनाची तरतूद करण्यात येते.
मान्सुनपूर्व उपाययोजना -
पावसाळा कालावधीत बालमृत्यु व साथीचे रोग टाळण्याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मे व जून महिन्यामध्ये वैद्यकीय पथके दुर्गम भागात पाठवून त्यांचे मार्फत प्रत्येक गावांत रुग्ण उपचार, बालकांची तपासणी व उपचार, लसीकरण, संदर्भ सेवा, साथरोग प्रतिबंधक उपाय योजना, इतर आजाराचे सर्वेक्षण इत्यादि कामे करुन घेण्यात येतात. पाणी शुद्धीकरणासाठी ब्लिचींग पावडर उपलब्ध करुन देण्यात येते.
सेवा केंद्रे –-
नवसंजीवनी योजनेअंतर्गत आदिवासी प्रवण क्षेत्रात ग्रामीण रुग्णालय, प्रा. आ. केंद्र, उपकेंद्र, आयुर्वेदिक दवाखाने या सर्व ठिकाणी रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. तसेच फिरत्या आरोग्य पथकामार्फत देखील आरोग्य सेवा दिली जाते.
नवसंजीवनी योजनेतील महत्वपूर्ण तथ्य -
आदिवासी भागातील माता मृत्यू प्रमाण आणि अर्भक मृत्यूदर कमी व्हावेत या उद्देशाने गडचिरोली जिल्ह्यांतील 9 तालुक्यामध्ये आदिवासी भागातील 303 गावांमध्ये नवसंजीवनी योजना राबविण्यात येत आहे.
• योजनेअंतर्गत प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकारी, निमवैद्यकीय कर्मचारी व एक वाहन असलेली अशी 54 फिरती वैद्यकीय पथके तयार करण्यात आली आहेत.
• ही पथके सर्व गावे व वाड्यांना भेटी देऊन कुपोषित व आजारी बालकांचा शोध घेऊन त्यांच्या घरी वैद्यकीय सेवा पुरवितात.
• माता मृत्युदर आणि अर्भक मृत्युदर कमी व्हावेत याकरिता नवसंजीवनी योजनेअंतर्गत मातृत्व अनुदान, दाई बैठका, मान्सूनपूर्व उपाययोजना, आहार व बुडीत मंजुरी तरतूद इ. सारख्या विविध योजना राबविण्यात येते आहेत.
• आदिवासी भागातील गरोदर महिलांची नोंदणी, नियमित आरोग्य तपासणी व आवश्यक त्या औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी नवसंजीवनी योजनेअंतर्गत मातृत्व अनुदान योजना राबविण्यात येत आहे.
फॉर्म :- pmmvy-cas.gov.in
राज्य सरकार :- 1.नवसंजीवनी योजना –Navsanjivani Scheme
2.मानव विकास कार्यक्रम – Manav Vikas Yojana
3.माहेर घर- Maher Ghar Scheme
केंद्र सरकार :- 1. प्रधानमंत्री मात्रु वंदना योजना –PMMVY
2. जननी सुरक्षा योजना -JSY
संयुक्त उपक्रम केंद्र आणि राज्य :- राष्ट्रीय आरोग्य अभियान
प्रस्तावना व उद्देश :- राष्ट्रीय आरोग्य अभियान ही केन्द्र शासनाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून सदर अभियानाची सुरुवात दिनांक १२ एप्रिल २००५ पासून करण्यात आली. सदर अभियानाचा मुख्य उद्देश मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे हा असून त्याचबरोबर ग्रामीण व शहरी जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणे हा आहे. त्याकरिता आरोग्य सेवा पुरविणाऱ्या सर्व शासकिय आरोग्य संस्थांचे स्तरावरील तांत्रीक आणि अतांत्रीक मनुष्यबळ व साधनसामुग्री सक्षम करणे, कौशल्यपुर्ण मानवी संसाधन (मनुष्यबळ) प्रदान करणे, जास्तीत जास्त जनता शासकिय रुग्णालयामार्फत आरोग्य सेवा घेण्यासाठी तयार होईल याकरिता योजनांची अंमलबजावणी करणे व लाभार्थ्यांना लाभ देणे, ईत्यादी कामे केल्या जात आहेत.
मनुष्यबळासंबधी माहिती :- सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत १२४८ पदे, १५ व्या वित्त आयोगांतर्गत तालुका सार्वजनिक आरोग्य पथकाकरिता ४८ पदे व शहरी आरोग्यवर्धिनी केन्द्राकरिता ८० पदे, मोबाईल मेडीकल युनिट करिता ४८ पदे तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांची ३४१ पदे अशी एकूण १७६५ पदे मंजूर आहेत. सदर पदांपैकी आजमितीस १३४४ पदे भरलेली असून ४२१ पदे रिक्त आहे. सदर मंजूर पदांमध्ये अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ पासून तर सपोर्ट स्टॉफ पर्यंतच्या तांत्रिक व अतांत्रिक पदांचा समावेश आहे. वेळावेळी रिक्त होणाऱ्या पदांपैकी विशेषज्ञ व वैद्यकिय अधिकारी संवर्गाकरिता दर बुधवारी मुलाखतीद्वारे तसेच इतर संवर्गाकरिता जाहिरात प्रकाशित करुन गुणांकन पद्धतीने नियुक्ती दिल्या जाते.
राष्ट्रीय सिकलसेल आजार निर्मुलन मिशन
गडचिरोली जिल्हयात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम जिल्हयात सन 2008-09 पासून राबविण्यात येत आहे. दि. 21 जून 2023 ला संपूर्ण भारतात राष्ट्रीय सिकलसेल आजार निर्मूलन मिशन कार्यक्रम राबविण्याबाबत मा. पंतप्रधान मोदी सरकारने सिकलसेल आजाराचे निर्मूलन 2047 पर्यंत करण्याची घोषणा केली आहे.
2011 च्या जनगणने नूसार जिल्हयाची एकुण लोकसंख्या 1,72,942 आहे. आणि आज 11.37 लक्ष आहे. जिल्हयात वर्गानुसार खालील प्रमाणे लोकसंख्या आहे.
अनुसूचित जमाती (ST) – ४,५०,८८० (३८.७०%)
अनुसूचित जाती (SC) – १,३०,२८३ (११.२५%)
१८ ते ६० या वर्षवयोगट- ६,८४,०५८ (पुरुष – ३४४०२५, महीला – ३४००३३)
० ते १ वर्षवयोगट – १८०९८
५ वर्षाआतिल- ८११९३
५ ते १० वर्षवयोगट – ६५५७७
१० ते १९ वर्षवयोगट – १३६४३५
या लोकसंख्यापैकी ८९ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. तसेच गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त व आदिवासी बहुल असून या जिल्हयात एनिमियाचे प्रमाण जास्त् असून सिकलसेल आजार रुग्णाचे प्रमाण जास्त आहे. सिकलसेल आजार हा लाल रक्तपेशी मध्ये होणारा आजार आहे. सर्वसाधारण व्यक्तींच्या शरीरातील लाल रक्तपेशींच्या आकार गोलाकार असतो पण सिकलसेल आजारामध्ये या रक्त पेशींचा आकार ऑक्सिजन मिळाला नाही तर विळयासारखा होतो.
• सिकलसेल आजाराचे दोन प्रकार आहे.
१) पिडीत SS (सफरर) – पिडीत व्यक्तीला वारंवार रक्तसंक्रमण करावे लागते, वारंवार जंतू संसर्ग होतो.
२) वाहक AS (कॅरीयर) – या व्यक्तीला सिकलसेल आजाराचा त्रास होत नाही पण ती व्यक्ती पुढच्या पिढीला सिकलसेल आजार देवू शकते.
• सिकलसेल आजाराचे लक्षण :-
१) हातापायावर सूज येणे
२) असहय वेदना
३) पक्षाघात होतो
४) मानसिक त्रास
५) जंतूसंसर्ग
६) रक्तक्षय
• सिकलसेल आजारची गंभिरता खालील गोष्टीने आढळते.
१) ताप
२) ऑक्सिजनची कमतरता
३) जलशुष्कता (डिहायड्रेशन)
४) अतिथंड वातावरण
५) जंतूसंसर्ग
• सिकलसेल रुग्णांची खालील लक्षणे आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखविणे
१) ताप येणे
२) छातीत दुखणे
३) श्वासोच्छवासात त्रास होणे
४) थकवा, अशक्तपणा, निस्तेजपणा वाटणे.
५) पोटदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी
६) धाप लागणे
७) वेदनाशामक गोळयांनी कमी न होणाऱ्या असहय वेदना.
८) दुष्टीदोष
• सिकलसेल आजाराचे निदान
आजाराचे निदान रक्त चाचण्या करुण खालील प्रमाणे करता येते.
१) सोल्युबिलिटी चाचणी - यात रुग्ण सकारात्मक किंवा नकारात्मक रुग्ण आहे हे कळते
२) इलेक्ट्रोफोरेसीस चाचणी – यात रुग्ण ग्रस्त (SS) आहे की वाहक (AS) आहे हे कळते.
३) एच.पी.एल.सी
ओषोधेपचार:-
१) फॉलीक ॲसिड औषध – सदर औषध जिल्हयातील सर्व आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध आहेत.
२) (DH/WH/SDH/RH/PHC/HWC/SC)
३) हॉड्रोक्सीयुरीया औषध – सदर औषध जिल्हयातील सर्व आरोग्य केंद्र स्तरावर उपलब्ध आहेत.
(DH/WH/SDH/RH/PHC/HWC/SC)
४) आवश्यकते नूसार रुग्णांना रक्त संक्रमण ची व्यवस्था जिल्हयातील रुग्णालयात (DH/WH/SDH/RH) करुण देण्यात आलेली आहे
राष्ट्रीय सिकलसेल निर्मुलन कार्यक्रमांतर्गत जिल्यातील सिकलसेल तपासणीचे उदिष्ट ३.१० लक्ष देण्यात आलेले आहे. जून २०२३ पासून २.७९ लक्ष सिकलसेल तपासणीचे उदिष्ट पुर्ण करण्यात आलेले आहे.
जिल्यात एकुण SS रुग्ण – २९८२ AS रुग्ण – ४१२५७
अनु.क्र. तालुक्याचे नाव सिकलसेल ग्रस्त रुग्ण् (SS) सिकलसेल वाहक रुग्ण (AS)
१ अहेरी ३३९ ४८८९
२ आरमोरी २२१ ३५३१
३ भामरागड २०२ २४४६
४ चामोर्शी ३११ ५४१८
५ धानोरा २५४ २९८८
६ एटापल्ली १५९ १२८८
७ गडचिरोली ५८६ ७४६६
८ कोरची १६३ ३३४२
९ कुरखेडा ३५५ ४४६८
१० मुलचेरा ४८ ५३७
११ सिरोंचा १९४ २९२२
१२ वडसा १५० १९६२
एकुण २९८२ ४१२५७
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY) साठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात:
आधार कार्ड
आधार मॅप केलेले बँक/पोस्ट ऑफिस खाते तपशील
मोबाईल नंबर
पात्रता पुरावा
एमसीपी/आरसीएचआय कार्ड
एलएमपी तारीख
एएनसी तारीख
बाळाचा जन्म प्रमाणपत्र
बाळाचे लसीकरण तपशील
महिला आणि तिच्या पतीचा ओळखीचा पुरावा
जननी सुरक्षा योजना -JSY आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
राशन कार्ड
प्रसूती नोंदणी प्रमाणपत्र
बँक खाते क्रमांक
जातीचे प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमातीच्या महिलांसाठी)
1)श्री.प्रताप शिंदे
प्रथम अपीलीय अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.गडचिरोली.
2)श्री.शंतणु पाटील
जन माहिती अधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी, आरोग्य विभाग,
जि.प.गडचिरोली
3)श्री.नरेश कनोजीया,
सहाय्यक जनमाहिती अधिकारी,आरोग्य विभाग,जि.प.गडचिरोली
कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक - दु.क्र.07132-222738