वित्त विभाग
|
वित्त विभाग हा जिल्हा परिषद, गडचिरोली चा महत्वाचा विभाग आहे जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करणे, शाखा निधी कोषागारातुन आहरीत/वितरीत करणे, सेवानिवृत्ती/कुटुंबनिवृत्ती प्रकरण निकाला काढणे, वेतन आयोगानुसार वेतनाची पडताळणी करुन प्रमाणीत करणे, जि.प. व पं.स. स्तरावरीत जमाखर्चाचा मेळ घेऊन पंजी अद्यावत करणे व जमा खर्चाचा वार्षिक लेखा प्रसिध्द करणे, जि.प. विभागातील योजना/वेतन भत्ता देयके तपासुन लेखांकण करुन नोंदणी अदयावत करणे, जि.प. व पं.स. स्तरावरील क्षेत्रीय कार्यालयातील दस्ताऐवजाचे वार्षिक तपासणी करुन त्रुटींची पुर्तता करुन घेणे, भ.नि.नि. / ठेव संलग्न विमा /अंशदाई निवृत्ती वेतन-क्षेत्रीय व जि.प. स्तरावरील भ.नि.नि. लेख्यांचे संगनकिकरण व खाते अदयावत करणे तसेच अग्रीम अंतिम प्रस्तावाला मान्यता देणे, विभागातील सेवाविषयक बाबी हाताळणे, गटविमा योजना अंतर्गत प्रस्ताव स्विकारुन पडताळणी करणे/मंजुरी देणे तसेच विभागाअंतर्गत योजना / वेतनदेयकाचे धनादेश वितरीत करणे अशा प्रकारची विविध कामे केली जातात.
अ.क्र. | पदाचे नाव | मंजुर पदे | भरलेली पदे | रिक्त पदे |
---|---|---|---|---|
1 | मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी | 1 | 1 | 0 |
2 | उपमुख्य लेखा तथा वित्त अधिकारी | 1 | 1 | 0 |
3 | लेखा अधिकारी | 2 | 2 | 0 |
4 | सहाय्यक लेखा अधिकारी | 24 | 22 | 2 |
5 | कनिष्ठ लेखा अधिकारी | 17 | 9 | 8 |
6 | वरिष्ठ सहाय्यक (लेखा) | 35 | 32 | 3 |
7 | कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | 33 | 29 | 4 |
जिल्हा परिषदेचा वित्त विभाग या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग १ अधिकारी असतो. मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी हे त्यांचे पद आहे. हेच अधिकारी जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीचे सचिव आहेत. यासोबत एक वर्ग १ अधिकारी राहतो. पंचायत समिती स्तरावर सहाय्यक लेखाधिकारी हा वर्ग ३ अधिकारी असतो. या विभागामार्फत जिल्हा परिषदेचे आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करणे, लेखाजोखा लिहिणे, विविध निधीचा ताळमेळ घालणे, सर्व प्रकारच्या निधीचे वाटप व नियंत्रण करणे व संपूर्ण निधी विहित कालावधीत खर्च करणे, लेखा हरकती निकाली काढणे आदी कामे या विभागामार्फत केली जातात. विभाग याशिवाय जिल्हा परिषदेचे निधीचे अंदाजपत्रक तयार करणे व त्यानुसार वर्षअखेरीस झालेल्या खर्चाचा ताळमेळ घालणे व हिशेब तयार करण्याचे काम केले जाते.
जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व वित्तीय बाबीचे नियंत्रण करणे व जलदगतीने वित्तीय कामे पार पाडणे.
1. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवेतन प्रकरणे व कुटुंबनिवृत्तीवेतन प्रकरणे मंजुर करणे.
2. गटविमा प्रकरणे मंजुर करणे.
3. जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक तयार करणे.
4. वेतन आयोगानुसार वेतन पडताळणी करणे.
5. जमा खर्चाचा वार्षिक लेखा प्रसिध्द करणे.
6. अग्रीम अंतिम प्रस्तावाला मान्यता देणे.
7. जि.प. स्तरावरील भ.नि.नि. लेख्यांचे संगनकिकरण व खाते अदयावत करणे.
प्रथम अपिलीय अधिकारी - श्री.विलास महादेव कावळे, मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, जि.प.गडचिरोली
जन माहिती अधिकारी - श्री. सि.पी.जमकातन, लेखा अधिकारी , वित्त विभाग
सहाय्यक जन माहिती अधिकारी - श्री. एस.बी.मेश्राम, सहाय्यक लेखा अधिकारी, वित्त विभाग मो.नं. 9422912719