कृषि विभाग
|
जिल्हयातील आदिवासी अनुसुचित जाती जमातीतील अल्प अत्यल्प भुधारक शेतकरी यांचा आर्थिक दर्जा उंचावण्याचा दृष्टीकोनातून व शेतीतील उत्पन्न वाढीसाठी शेती उपयोगी साहीत्याचे वितरण करणे व सिंचन उपयोगी योजना राबवून शेतकऱ्यांना दर्जोन्नत करणेकरीता विविध प्रकारच्या संकल्पना राबविण्यात येतात त्याकरीता जिल्हा स्तरावर व पंचायत समिती स्तरावर सक्षम यंत्रणेची उभारणी करण्यात आलेली आहे.
कृषि विभागातील योजना ग्रामीण शेतक-यापर्यंत पोहचविण्या करीता पंचायत समिती अंतर्गत कार्यरत कृषि अधिकारी व विस्तार अधिकारी (कृषि) यांच्या माध्यमातून शेती विषयक सोयी सवलती पुरविल्या जातात. यामध्ये जिल्हा निधी अंतर्गत योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुडा कृषि क्रांती योजना विषयक सेवा पुरविण्यात येतात.
१.जिल्हा वार्षिक योजना
बिरसा मुंडा क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत )(क्षेत्राबाहेरील) TSP व OTSP योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे.विहीर,इनवेल बोअर पंपसंच , डिझेल इंजिन पाईप,औजारे बियाणे खते/किटकनाशके)परसबाग, सोलरपंप ,विहीर दुरुस्ती , विंधन विहीर, शेततळा ,अस्तरीकरण इत्यादीचा लाभ देण्यात येतात.
२. जिल्हा निधी योजना
जिल्हा निधी योजना व १३ वने वनमहसुल योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सुधारीत बियाणे ,किटकनाशके,भाजीपाला मिनीकिट, जाळीचे तार,ताडपत्री इत्यादी साहीत्य वाटप करण्यात येते.
जिल्हयातील शेतकऱ्यांना लागणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाकरीता रासायनिक खताची व बियाणाचे नियोजन तयार करण्यात येते व जिल्हयात टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात येते.
३.जिल्हयातील शेतकऱ्यांना गुणवत्ता पुर्ण रासायानिक खते ,बियाणे व किटकनाशके यांचे पुरवठा होणेस्तव नमुने काढून प्रयोगशाळेत पाठविण्यात येते.
१.अनुसुचित जाती /नवबौध्द शेतकऱ्यांना जिवनमान उंचविण्यासाठी योजना राबविले जाते.
२. अनुसुचित जातीतील शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करणे व जिवनमान उंचावणे.
३.शेतकऱ्यांना अनुदानावर कमी किमतीत बियाणे किटकनाशके व औजारे उपलब्ध करुन देणे.
४.जिल्हयातील शेतकऱ्यांना गुणवत्ता पुर्ण निविष्ठा उपलब्ध करुन देणे.
श्रीमती रेणू दुधे कृषि अधिकारी पं.स.कोरची व श्री तुषार पवार वि.अ.कृषि यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून जि.प.स्तरावरुन पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
सेवा :- १. बिरसा मुंडा क्रांती योजना (क्षेत्राअंतर्गत )(क्षेत्राबाहेरील) TSP व OTSP योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे.विहीर,इनवेल बोअर पंपसंच ,डिझेल इंजिन पाईप,औजारे बियाणे ,विंधन विहीर, खते /किटकनाशके) परसबाग,सोलरपंप ,विहीर दुरुस्ती ,शेततळा ,अस्तरीकरण
२.जिल्हा निधी योजना व १३ वने वनमहसुल योजना अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सुधारीत बियाणे ,किटकनाशके,भाजीपाला मिनीकिट,जाळीचे तार,ताडपत्री .
३. जिल्हयातील शेतकऱ्यांना लागणाऱ्या खरीप व रब्बी हंगामाचे रासायनिक खताची व बियाणाचे नियोजन तयार करण्यात येते
४. गुणवत्ता पुर्ण रासायानिक खते ,बियाणे व किटकनाशके
राज्यसरकार :- १.डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वावंलबन योजना
२.बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
केंद्रसरकार:- राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रम
योजना कागदपत्रे :- महाडिबीटी वेबसाईट पोर्टल द्वारे संबधित कागदपत्रे अपलोड करतात.
दरवर्षी कृषि मेळावे घेतले जातात. तसेच शेतकरी सभा वेळोवेळी घेतले जातात. कृषि केंद्राची तपासणी ,जिल्हयातील खत व बियाणे पुरवठा नियंत्रण.
श्रीमती एस.टि.आस्कर जन माहीती अधिकारी तथा सहाय्यक प्रशासन अधिकारी भ्रमणध्वनी क्र.९४२३६४४९८४
१.डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
२. बिरसा मुडा कृषि क्रांती योजना
कालावधी प्रारंभ - एप्रिल २०२४
कालावधी समाप्त -मार्च २०२६
क्षेत्र - गडचिरोली जिल्हा
लाभार्थी - ६५०
फायदे - सिंचन विहीर ,मोटारपंप,विजजोडणी,इनवेल बोअर,पाईप इ.
अर्ज कसा करावा - महाडिबीटी वेबसाईट पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करावा.