जिल्हा ग्रामीण विकास विभाग

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

विभाग प्रमुखाचे नाव श्री.राजेंद्र एम.भुयार
पदनाम प्रकल्प संचालक
दुरध्वनी क्रमांक ०७१२२-२३६४
ई-मेल drdagadchiroli@rediffmail.com 
कक्ष प्रमुखाचे नाव श्रीमती.नयना रमेश कुमरे
पदनाम कनिष्ठ प्रशासन अधिकारी
दुरध्वनी क्रमांक ०७१२२-२३६४
ई-मेल drdagadchiroli@rediffmail.com 
1. केंद्र पुरस्कृत योजनाची राज्यात प्रभावी अंबलबाजवणी व्हावी याकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या संस्थेची स्थापना रजिस्ट्रेशन ऑफ सोसायटी अॅक्ट 1860 व मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1950,अन्वये करण्यात आलेली आहे. योजनांची प्रभावी अंबलबाजवणी व्हावी करिता शासन निर्णय क्र. जिग्राप-1121 प्र.क.43/ योजना-5, मंत्रालयमुंबई -400 001 दि. 1 एप्रिल 2022 अन्वये नवीन आकृतीबंध लागु करण्यात आलेला आहे. दारिद्र्य विरोधी कार्यक्रमांचे व्यवस्थापन तसेच दारिद्र्य रेषेखालील व्यक्ति आणि कुटुंब यांचेजीवनमान उंचवण्याकरिता विविध योजनाची अंबलबजवणी करण्यास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सक्षम आहे. 2. राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये केली.महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने दिनांक १८ जुलै २०११ रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित केला.
• दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी त्यांना मदत करणे. • आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या समुहास तसेच बचत गटास बँक समुहामार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून आर्थिक स्थिरता प्रदान देणे. • घरकुल योजनेमार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून मूलभूत सुविधा पुरविणे. • लखपती दीदी योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना विविध प्रशिक्षण व आर्थिक पाठबळ उपलब्ध करून करणे.
• केंद्र शासन पुरस्कृत योजनांची अंबलबाजवणी करणे. • दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना वैयक्तिक व सामुहिक योजनांनमध्ये लाभ देणे. बचत गटामार्फत महिलाना स्वावलंबी बनवणे (लखपती दीदी योजणेमार्फत प्राप्त उद्दीष्ट पूर्ण करणे). • स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी स्वरोजगार उपलब्ध करून देण्यासआर्थिक मदत करणे व त्यांना कर्ज पुरवठा करण्यास सहाय्य करणे. • घरकुल योजनेमार्फत दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत उपलब्ध करून त्यांना कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देणे. • भारत सरकार व महाराष्ट्र शासनातर्फे वेळोवेळी राबविलेल्या विशेष योजनांची अंबलबजावणी करणे. योजनांचे मुख्य् उदेश गाठण्यासाठी व्यक्तीगत आणि गट लाभार्थींसाठीलघुउदयोग सारख्या विकासाच्या सर्व क्षेत्रात गुंतवणूक आणि उत्पादक योजना राबविण्यांसाठी पुरेसे आर्थिक व्यवस्थासपकीय आणि संघटनात्म‍क सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यासाठी सर्व कार्यवाही करणे.
• महा-आवास अभियान २०२१-२२ मध्ये उत्कृष्ट काम कारणार्‍या संस्थांना राज्यस्तरीय महा-आवास अभियांनातंर्गत राज्यात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. • महा-आवास अभियान-ग्रामीण २०२१-२२ अभियानतंर्गत विभागस्तरावर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. • बँक लिंकेज मध्ये उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रकल्प संचालक , जिल्हा अभियान व्यवस्थापक व उमेद संघास सन २०२१-२२ मध्ये पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
राज्यस्तरीय : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र राज्य तालुकस्तरीय: उमेद- एमएसआरएलएम कार्यालय, पंचायत समिती
सेवा 1. प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (केंद्रसरकार योजना, भारत सरकार) 2. रमाई आवास योजना (सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन) 3. शबरी आवास योजना (आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन) 4. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय कल्याण, कामगार विभाग, महाराष्ट्र शासन) 5. अटलबंधकाम कामगार आवास योजना - ग्रामीण (उद्योग, ऊर्जा आणि समाजकल्याण विभाग, महाराष्ट्रसरकार) 6. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आवास योजना (इतर मागास बहुजनकल्याण विभाग, महाराष्ट्र शासन) 7. मोदी आवास योजना (इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार) 8. पंडित दिनदयाल जमीन खरेदी योजना (PDU) (ग्रामीण विकास विभाग, महाराष्ट्र सरकार) 9. उमेद अभियानांतर्गत राबविण्यात येणारे सर्व उपक्रम फॉर्म 1. सर्व प्रकारचे घरकुल संबंधित फॉर्म खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे. https://www.mahaawaas.org/ 2. सर्व प्रकारच्या उमेद अभियान संबंधित माहिती तसेच योजनेअंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व शासन निर्णय खालील वेबसाइट वर मिळेल. https://www.umed.in/
राज्यसरकार :- १. रमाई आवासयोजना (सामाजिक न्यायविभाग, महाराष्ट्र शासन) २. शबरी आवास योजना (आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन) ३. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना (विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गीय कल्याण,महाराष्ट्र शासन) ४.अटल बंधकाम कामगार आवास योजना - ग्रामीण (कामगार कल्याण विभाग,महाराष्ट्र सरकार) ५. पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकरआवास योजना (इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन) ६. मोदी आवास योजना (इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महाराष्ट्र सरकार) ७. पंडित दिनदयाल जमीन खरेदी योजना (PDU) (ग्रामविकास विभाग, महाराष्ट्रसरकार) ८. महिला साक्षमीकरण कार्यक्रम (उमेद- MSRLM अंतर्गत) केंद्रसरकार :- १. प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण (पंचायत राज विभाग,केंद्रसरकार) २. पी.एम.जनमन आवास योजना
योजना कागदपत्रे :- 1) MSRLM संबंधित सर्व प्रकारच्या योजना तसेच संबंधित कागदपत्रे खालील वेबसाइट वर मिळेल. https://www.umed.in/ 2) घरकुल संबंधित सर्व प्रकारची माहिती ,जीआर, वेळोवेळी प्रसिद्ध होणारे शासकीय निर्णय खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे. https://www.mahaawaas.org/
श्री. लीलाधर के.बेडके जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक प्रकल्प अधिकारी संपर्क क्र. 9421734685
error: Content is protected !!