महाराष्ट्राची भव्यता आणि विविधतेने तुम्ही स्तिमित व्हाल. इथल्या पर्वतराजींवर जिथवर तुमची नजर पोहोचेल, तितके तुम्ही रोमांचित व्हाल. इथले अभेद्य, महाकाय गडकिल्ले आजही खंबीरपणे अन ताठ मानेने उभे आहेत. इथली असंख्य मंदिरे व लेणी शिलाखंडामधून कलापूर्णरित्या कोरली आहेत.
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती २६ आगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून झाली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा पूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये समाविष्ट होता व मुख्यतः गडचिरोली, सिरोंचा ही ठिकाणे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तहसील म्हणून कार्यरत होती. गडचिरोली जिल्ह्याचे एकुण क्षेत्रफळ १४४१२ चौ.कि.मी.आहे